सातारा :
साताऱ्याचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या कास पुष्प पठारावर हौसेने मज्जा करायला जाणाऱ्यांचीच संख्या जास्त असते. ज्यांना काम आहे. जो कष्टकरी वर्ग आहे, तो कधीही कासकडे जात नाही. जे पैसेवाले आहेत, जे दारु पिणारे आहेत. जे कॉलेजच्या नावाखाली कास पठारावर चकाट्या मारायला जाणाऱ्यांचीच संख्या जास्त पाहायला मिळते. अशाच कास पठारावर यावर्षी पावसामुळे लवकर हंगाम येईल, असे फूल संशोधक असलेल्या तज्ज्ञ मंडळींकडून सांगण्यात येत आहे तर स्थानिक जी ती फुले ज्या त्या हंगामातच येणार, असा दावा करत आहेत.
सातारा शहरापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पुष्प पठारावर फुले पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळा संपताना ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात आणि सप्टेंबरच्या महिन्यात गर्दी होते. विशेष करुन रविवार आणि शनिवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. दरवर्षी वनविभागाकडून हंगाम हा १५ ऑगस्ट नंतर हंगाम सुरु होत असतो. फुले पाहण्यासाठी अनेक जण जातात. त्यापैकी काही हौशे काही मज्जा घ्यायला काही वेगळ्या हेतूने जातात, तेथे जाणाऱ्यांमध्ये कोणीही कष्टकरी दिसत नसतो. कोणीही दररोज कामावर जाणाऱ्या वर्गातील नसतो तर ज्यांच्याकडे पैसा बकळ आहे, ज्यांना एन्जॉय करायचा आहे, अशीच मंडळी कास पठारावर जाताना दिसते.
फूलवेडे त्यातले एखादा दुसरा टक्काच आढळून येतात, अशी नेहमी चर्चा होत असते. यावर्षी पावसाळा लवकर सुरु झाला. त्यामुळे यावर्षी कासच्या फुलांचा हंगामही लवकर येईल, असा फुलांवर संशोधन करणाऱ्या मंडळीचा दावा आहे तर स्थानिकांचा फुलांचा हंगाम हा त्याच हंगामात होणार आहे. अगोदर फुले येत नाहीत. फुलांचा बहर येण्याचा विशिष्ट हंगाम असतो त्याच वेळी त्या प्रजातीचे फुले येतात, असा स्थानिकांचा दावा आहे. मात्र पावसास प्रारंभझाल्याने आतापासून कास पठारावर फिरायला येणारांची गर्दी वाढली आहे.
- पाऊस कमी झाला की फुले येतील
यावर्षी हंगाम लवकर येईल, अशी शक्यता आहे. दरवर्षी हंगाम हा १५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यान येत असतो. यावर्षी पाऊस लवकर आल्याने फुलेही लवकर येणार आहेत. फुलांचा हंगाम लवकर होणार आहे.
-डॉ. संदीप श्रोत्री, फुलतज्ज्ञ, कास पुष्प पठारावरील फुलांचा शोध घेणारे








