Early Bed Person : प्रत्येक यशस्वी व्यक्ती सकाळी लवकर उठतो असं म्हटलं जातं. सकाळी लवकर उठल्याने शरीराला अनेक चांगले फायदे होतात.शिवाय दिवसभर मन ही प्रसन्न राहते.लवकर उठल्याने दिवसभरातील कामाची विभागणी केली तर कामाचा ताण कमी होतो. आणि काम वेळेत झाले नाही म्हणून ट्रेसही येत नाही. आपण बऱ्याच वेळेला ठरवतो लवकर उठायचं म्हणून मात्र काहीच उपयोग होत नाही. लवकर उठण्यासाठी गजर लावणे हा पर्याय नसून मनातून इच्छा असणं गरजेचं आहे.याचबरोबर काही गोष्टी ठरवून केल्या तर तुम्ही निश्चित लवकर उठू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.
रात्री चहा किंवा कॉफी पिऊ नका
चहा-कॉफी हा आपल्या दिनचर्येचा भाग झाला आहे.मात्र रात्रीच्या जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणे अनेकांना आवडते.परंतु, असे केल्याने तुमच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.जर तुम्हाला रात्री चांगली झोप घ्यायची असेल आणि सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफीपासून दूर राहा.यामुळे तुम्हाला झोप लागणे सोपे होईल आणि तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल.
रात्री उशिरा खाणे टाळा
सकाळी वेळेवर उठण्यासाठी रात्री उशिरा काही खाणे टाळावे.बर्याच वेळा लोकांना रात्री जेवल्यानंतर एक ते दोन तासांनी स्नॅक्स खाण्याची सवय असते.पण, जर तुम्ही झोपण्याच्या काही मिनिटे आधी स्नॅक्स खाल्ले तर ते नीट पचत नाही आणि झोपताना तुमच्या पोटात हालचाल जाणवते आणि तुम्हाला लवकर झोप येत नाही. तुम्ही वेळेवर झोपला नसल्याने तुम्हाला जाग ही लवकर येत नाही. यासाठी रात्री उशिरा खाणे टाळा.
फोनचा वापर टाळा
आजकाल झोपण्यापूर्वी अनेकांना फोन पाहायची सवय लागलीय. मात्र झोपण्याआधी तुम्ही हातात मोबाईल घेता तेव्हा थोडावेळ मोबाईल पाहू आणि बाजूला ठेवून देऊ असं ठरवतो. मात्र जवळपास दोन तासापेक्षा अधिक वेळ मोबाईलवर जातो.परिणामी झोपायला वेळ होतो, उठायलाही वेळ होतो. तुम्ही झोपण्याच्या किमान 2 तास आधी फोन वापरणे बंद करा.यामुळे तुमचं सर्व लक्ष दिवसभर केलेल्या कामावर जाईल. आणि चिंतन करत तुम्ही लवकर झोपाल. यामुळे तुमची 8 तासांची झोप पूर्ण होईल. आणि सकाळी जाग लवकर येईल.
झोपण्याची वेळ ठरवा
सकाळी लवकर उठण्यासाठी वेळेवर झोपणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्या वेळी उठायचे आहे आणि कोणत्या वेळी झोपायचे आहे त्यानुसार तुमची झोपण्याची वेळ निश्चित करा. यासाठी तुमची किमान रात्री 7-8 तास झोप होणे गरजेची आहे. त्यानुसार तुमच्या झोपायच्या वेळा ठरवा.
झोपेतून उठल्याबरोबर हे काम करा
जर तुम्हाला सकाळी लवकर जाग आली तर पुन्हा झोपू नका.कारण पुन्हा झोपलात की तुम्हाला गाठ झोप लागेल आणि तुमची दैनंदिनी खराब होईल. यासाठी उठल्यानंतर लगेच खोलीचा लाईट चालू करा. तुमच्या डोळ्यांवर प्रकाश पडल्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही. उठल्यावर इकडे तिकडे चालायला सुरुवात करा. यामुळे तुमची झोप नाहीशी होईल.
Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.