आर्थिक वर्षात निव्वळ रू.21.59 कोटी विक्रमी नफा : व्हीपीके सहकार परिवर्तन पॅनलची यशस्वी घोडदौड
फोंडा : राज्यातील सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच विक्रम नफा कमाविण्यात व्हीपीके अर्बन कॉ ऑप व्रेडीट सोसायटीने नेत्रदिपक कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 सालासाठी विक्रमी रू. 21.59 कोटी निव्वळ नफा कमावित सहकार क्षेत्रातील आपला दबदबा कायम राखला आहे. एकूण 36 शाखांमधून राज्यभरात कार्यरत असलेल्या व्हीपीके अर्बनच्या 35 शाखा निव्वळ नफा कमाविण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत. याचे सर्व श्रेय भागधारकांनी सोसायटीला कठिण काळात दिलेली भक्कम साथ व सोसायटीने दाखविलेली विश्वासहर्ता ठरली असून सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेचे हा मैलाचा दगड पार करू शकल्याचा विश्वास व्हीपीके अर्बनचे अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी व्यक्त केला आहे. व्हीपीके ही गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रणी पतसंस्था असून राज्यभरातील लाखो भागधारकांच्या विश्वासावर ती उभी आहे. व्हीपीकेच्या 36 शाखांमधून फोंडा शाखेने अव्वल स्थान प्राप्त केले असून त्याच्यापाठोपाठ म्हार्दोळ व फातोर्डा शाखेने उच्चाकी नफा कमावलेला आहे. ग्राहकांमध्ये संस्थेबद्दल पुन्हा एकदा विश्वास संपादन करतानाच संस्थेला उच्च शिखरावर पोचविल्याचा आनंद नवीन संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. मागील वर्षाची नुकसानी भरून काढल्यानंतर पुढील आर्थिक वर्षी भागधारकांना लाभांश जाहीर करणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
आर्थिक स्थिती 31 मार्च 2023 पर्यंत पुढील प्रमाणे आहे :
शेअर कॅपिटल रू. 33.97 कोटी, रिसर्व फंड रू. 29.18 कोटी, टोटल डेपोझिट रू. 557.61 कोटी, लोन अॅन्ड एडव्हान्स रू. 445.45 कोटी, इनव्हेस्टमेंट अॅन्ड डेपोझिट रू. 248.57 कोटी, निव्वळ नफा रू. 21.59 कोटी आहे. मागील वर्षी 2022-23 सालासाठी 153.97 कोटी रूपयांचे कर्जाचे वितरण करण्यात आले होते. त्यामधून सोसायटीने 191.77 कोटी रूपयांची कर्जाची वसुली करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये ओटीएस योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 937 कर्जधारकांनी रू. 13.13 कोटीचे व्याजही माफ करण्यात आलेले आहे.
ऐतिहासिक यशाचे सर्व श्रेय व्हीपीके परिवर्तन टिमला-दुर्गादास गावडे
व्हीपीके अर्बनच्या तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच रू. 21.59 कोटी रूपयाचा निव्वळ प्राप्त केलेला आहे. यात व्हीपीकेच्या सर्व 236 कर्मचारी, 81 पिग्मी एजंटचा महत्वाचा वाटा आहे. सरकारने कोविड काळात कर्जधारकांसाठी सुलभ कर्जफेडीसाठी जारी केलेली ओटीएस योजनेचा लाभ घेत कर्जदारांनी मोठा पुढाकार घेत कर्जवसुली केल्यामुळेच मोठी झेप घेण्यात व्हीपीके बाजी मारलेली असल्याचे सांगितले. व्हीपीके सहकार परिवर्तन पॅनलने 18 एप्रिल 2021 रोजी ताबा घेतला होता. या संचालक मंडळाची धुरा अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी समर्थपणे सांभाळलेली आहे. त्यात उपाध्यक्ष सुर्यकांत गावडे, संचालक आनंद केरकर, रामा उर्फ सुर्या गावडे, हिरू खेडेकर, दिना बांदोडकर, रोहिदास गावडे, हेमंत गावडे, चिराग गावडे, सावित्री वेलिंगकर, सुषमा गावडे, व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे, सरव्यवस्थापक संतोष केरकर यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच हे साध्य झाल्याची माहिती अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी दिली.
आजादी का अमृतमहोत्सवर्षीनिमित्त सुलभ कर्ज व बचत योजना
आजादी का अमृतमहोत्स या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्यवर्षानिमित्त व्हीपीकेतर्फे ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी व्हीपीके तिरंगा मुदत ठेवी योजना 75 दिवस, 75 महिन्यासाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्के जास्त व्याजदर देण्यात येत आहे. त्याशिवाय कर्जफेडीसाठी थेट पगाराला जोडून आरडी, ग्रुप आरडी कर्ज योजना सरकारी कर्मचाऱ्यासाठी कमालीची सोयीस्कर ठरत आहे. मध्यंतरी व्हीपीके संस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने बसविण्यासाठी व्हीपीकेच्या ज्या विश्वासू भागधारकांनी दोन वर्षापुर्वी व्हीपीके सहकार परिवर्तन पॅनलला निवडून दिले होते तो विश्वास आज खऱ्या सार्थ करून दाखविलेला आहे. चांगली सेवा व संस्थेच्या भरभराटीसाठी सदैव प्रयत्नशील राहण्यासाठी आपले संचालक मंडळ बांधिल असल्याचे अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी सांगितले.
सहकार मंत्री, सहकार निबंधक यांचे मोलाचे मार्गदर्शन
सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांचे लाभलेले महवाचे सहकार्य तसेच सहकार निबंधक विशांत गावणेकर यांचे महत्वाचे मार्गदर्शन संस्थेला लाभल्याचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे यांनी सांगितले. व्हीपीके अर्बनला सहकार क्षेत्रात गरूडभरारी घेण्यासाठी सहकार परिवर्तन पॅनेल खरे शिल्पकार ठरले आहे.









