संतोष पाटील,कोल्हापूर
मानवी तसेच पर्यावणीय आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या ई कचऱ्याचे शास्त्रीय पध्दतीने निराकरणाची मोहीम कागदावरच आहे.येत्या वर्षभरात घनकचऱ्याचा प्रश्न निकाली निघेल, हे मागील दहा वर्षापासूनचे आश्वासन सत्यात उतरणार कधी?वर्षाला शहरात तयार होणाऱ्या पाच हजार टन ई कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याची गरज तिव्र आहे. शहरात चार संकलन केंद्र उभारून ई कचऱ्याच्या घातक परिणामातून शहरवासीयांची सुटका करण्याचे आव्हान मनपा कधी पेलणार ?
केंद्रीय पर्यावरण विभागाने 12 मे 2012 ला दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मुंबईपाठोपाठ पुणे,नाशिक व ठाणे शहरात ई-कचरा निर्मुलनासाठी प्रकल्प उभारण्यात आले. कोल्हापुरात मात्र जागोजागी भंगार जमा करणाऱ्यांकडून ई-कचऱ्यातून मिळणारे गुंजभर सोने,चांदी,तांबे,लोखंड,अॅल्युमिनियम आदी धातूंच्या आमिषाने खराब झालेले टिव्ही,कॉम्युटर,फ्रिज,मोबाईल,ए.सी.वायर्स,सीडी,बल्ब,आदींची अशास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. कॅथॉड रे ट्युब, पीबीसी बोर्ड, चिप्स् व इतर वस्तूंचा सोन्याचा मुलामा असलेले घटक,वायर्स, टोनर,स्टिल रोलर आदी ईकचऱ्यातील घटकांतून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी संपूर्ण शहरातील पर्यावरण बिघडण्याचा उद्योग सुरु आहेत.
यातून मिळणाऱ्या धातूंसाठी याची मोडतोड करुन जाळण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत.सहजासहजी न मिळणाऱ्या धातूसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना नायट्रिक व हायड्रोक्लोरिक?सिडमध्ये बुडविले जाते.या प्रकाराने वातावरणात डायऑक्सिन हा विषारी वायू मोठ्या प्रमाणात मिसळल्याने पर्यावरण बिघडण्याबरोबरच आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. वास्तवित ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असूनही त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.तत्कालीन स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी ई-कचऱ्याचा धोका ओळखून 2014 साली मनपाच्या विभागीय कार्यालयात खराब इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जमा करण्याची मोहीम सुरु केली. मात्र, ई-कचऱ्याचे गांभीर्य नसल्याने यंत्रणेने ती मोडीत काढली. कोल्हापुरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या या समस्येवर उपाय योजना करण्यात आता महापालिकेने सकारात्मक पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
हवेत व पाण्यात मिसळणारे घटक
ई कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट न लावल्यास क्लोरिन,सल्फर डाय ऑक्साईड,क्लोरिनेटेड डायोक्सिन,पॉलिक्लिनिक एरोमॅटिक हाटड्रोकार्बन्स्,बेरिलियम कॅडियम आदी विषारीसदृष्य घटक व वायूंचा वातावरणात भडीमार होतो.हे घटक पाणी व हवेत सहज मिसळतात.यामुळे मानवी तसेच प्राण्यांच्या आरोग्यावार दृष्य व अदृष्य असे विघातक परिणाम होतात.श्वसनाचे आजार,डोळे दुखणे,अस्वस्थ वाटणे आदी रोगांस निमंत्रण मिळत आहे.
ई-कचरा म्हणजे काय?
खराब झालेल्या सीडी, वायर्स, कॉम्प्युटर, फ्रिज, ए.सी. मोबाईल, आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व त्यांच्या सुट्या भागापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यास शास्त्रीय भाषेत ई वेस्ट (ई-कचरा) असे संबोधले जाते
इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन मदत करणार
पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या ई कचऱ्याचे शास्त्रीय पध्दतीने निराकरण होणे गरजेचे आहे.कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन या याकामी महापालिकेला मदत करु शकते. तसेच नागरिकांत ईकच्रयाबाबत प्रबोधन करेल. ई कच्रयातून शहरावासीयांची सुटका व्हावी यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
संदीप नष्टे ( माजी अध्यक्ष- कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








