E-Peak Inspection through App is required for purchase of paddy
वेंगुर्ला तालुक्यातील सर्व भात पिकाचे उत्पादन घेणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांनी पीक पाहणी व्हर्जन-2 हे अँप डाऊनलोड करुन आपली पीक पहाणी अद्ययावत करावी असे आवाहन वेंगुर्ले तहसिलदार प्रवीण लोकरे यांनी केले आहे.सन 2022-23 वर्षाच्या खरीप हंगामातील भात शेतमालाची खरेदी पणन महामंडळाकडून अधिकृतरीत्या नियुक्त केलेल्या तालुका खरेदी विक्री संघ मर्यादीत वेंगुर्ले (ता. वेंगुर्ले जि.सिंधुदुर्ग, बॅ.नाथ पै रोड, रामेश्वर मंदीर नजिक, वेंगुर्ले) येथे करण्यात येणार आहे.
सदरच्या भात (धान) खरेदीसाठी भात उत्पादक शेतकऱ्यांनी दि. 21 ऑक्टोबर पर्यंत आपली नोंदणी तालुका खरेदी-विक्री संघ मर्यादीत वेंगुर्ले, यांचेकडे करणे अनिवार्य आहे. सदर मुदतीत आपण आपली नोंदणी न केल्यास आपल्या शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किंमतीमध्ये केली जाणार नाही, यांची सर्व भात उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. नांव नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक व सन 2022-23 पीक पाहणी अद्ययावत असणारा 7/12 उतारा एवढया कागदपत्राची आवश्यकता आहे.
तसेच सन 2022-23 या कालावधीतील पीक पाहणी अद्ययावत करण्यासाठी सर्व भात उत्पादक शेतकऱ्यांनी पीक पाहणी व्हर्जन-2 हे अँप डाऊनलोड करुन आपली पीक पहाणी अदययावत करावी. ई-पीक पाहणी अदययावत करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppcordova या लिंकचा वापर करावा. असे आवाहन वेंगुर्ले तहसिलदार यांनी केले आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-









