वाढीसोबत विक्री 76,000 कोटी रुपयांवर
नवी दिल्ली
ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात 76,000 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. ही आकडेवारी वार्षिक दराच्या आधारावर सुमारे 25 टक्के अधिक असल्याची माहिती आहे. सर्च फर्म रेडसीर स्ट्रटेजी कन्सल्टंट्सने ही माहिती दिली आहे.
कंपनीचे भागीदार उज्ज्वल चौधरी म्हणाले की, एकूणच ई-कॉमर्स कंपन्यांची कामगिरी अंदाजानुसार आहे. ते म्हणाले, ‘आमचा अंदाज 83,000 कोटी रुपये होता पण तो 76,000 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. आमच्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा हे 8-9 टक्के कमी आहे. तथापि, 76,000 कोटी रुपयांचा विक्रीचा आकडा चांगला आहे. वार्षिक पायाभूत वाढ 25 टक्के आहे, जी चांगली असल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे.’









