पुलाची शिरोली /वार्ताहर
गुरुवारी सकाळी शिरोली गावठाणला पुरवठा करणारी बापट कॅम्प येथून निघालेली उच्चदाब विद्युत वहिनी येथील ऊस संशोधन केंद्राच्याजवळ नादुरुस्त झाली होती. यामुळे शिरोली गावातील विज पुरवठा खंडीत झाला होता.
याची माहिती शिरोलीतील महावितरण कर्मचाऱ्यांना समजली असता प्रधान तंत्रज्ञ अशोक कोळी, वरिष्ट तंत्रज्ञ अजम फकीर व रामचंद्र वडेकर या वितरण कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने पुराच्या पाण्यामध्ये जाऊन वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावण केलेल्या या धाडसी कार्यामुळे शिरोली गावठाणचा पुरवठा काही मिनिटांच्या आतमध्ये पूर्ववत झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.