प्रतिनिधी/ बेळगाव
दसरोत्सवासाठी नैऋत्य रेल्वेने बेळगाव-बेंगळूर मार्गावर विशेष रेल्वेफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे क्र. 07307 बेळगाव-विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळूर यादरम्यान मंगळवार दि. 24 रोजी एक्स्प्रेस धावणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 6.55 मिनिटांनी बेंगळूर येथे पोहोचेल. तर बुधवार दि. 25 रोजी सायंकाळी 7.30 वा. बेंगळूरमधून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वा. बेळगावला पोहोचणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेफेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









