रत्नागिरी :
तालुक्यातील वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील (ऱा वाटद खंडाळा) याला सीताराम वीर याच्या खुनाच्या गुन्ह्यात जयगड पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल़ी
प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम वीर हा सातत्याने फोन करून त्रास देत असल्याच्या रागातून दुर्वासने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला जबर मारहाण केली होती. या मारहाणीत सीमारामचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दुर्वास पाटील, विश्वास पवार व मयत राकेश जंगम या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता पोलिसांकडून दुर्वास पाटील याचा बाप दर्शन यालाही अटक करण्यात आली आह़े यापैकी दुर्वास पाटील व विश्वास पवार हे भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात शहर पोलिसांच्या कोठडीत आहेत़ तर नीलेश भिंगर्डे याला राकेश जंगम खून प्रकरणात जयगड पोलिसांनी अटक केली होत़ी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आह़े
- भक्तीच्या खूनातील कार पोलिसांकडून जप्त
16 ऑगस्ट 2025 रोजी खंडाळा येथील सायली बार येथे दुर्वास पाटील, विश्वास पवार व सुशांत नरळकर यांनी भक्ती मयेकर हिचा गळा आवळून खून केल़ा यानंतर तिघाही संशयितांनी भक्तीचा मृतदेह कारमध्ये भरल़ा तसेच तो आंबा घाट येथे नेवून घनदाट जंगलात फेकून दिला होत़ा पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना खून प्रकरणात वापरलेली कार जप्त केली आह़े








