रत्नागिरी :
तालुक्यातील कळझोंडी गावातील सीताराम वीर याच्या खून प्रकरणात पोलिसांनी दुर्वास पाटील व विश्वास पवार याला अटक केली आह़े भक्ती मयेकर खून प्रकरणात दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत होत़े या ठिकाणाहून पोलिसांनी दोघांना अटकेत घेवून न्यायालयापुढे हजर केल़े यावेळी न्यायालयाने दोन्ही संशयितांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल़ी जयगड पोलिसात दाखल असलेल्या या गुह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर करत आहेत़
दुर्वास पाटील याची प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम हा फोन करत असल्याच्या संशयातून दुर्वास पाटील, विश्वास पवार व राकेश जंगम या तिघांनी 29 एप्रिल 2024 रोजी खंडाळा येथील सायली बारमध्ये मारहाण केली होत़ी या मारहाणीत सीताराम याचा मृत्यू झाला होत़ा मारहाणीनंतर मृत झालेल्या सीताराम याला दुर्वासने रिक्षा कऊन घरी पाठवल़े तसेच सीताराम हे बेशुद्ध होवून पडले असून त्यांना दुखापत झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितल़े दुर्वास याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नातेवाईकांनी घरी डॉक्टर बोलावून सीताराम याची तपासणी केली व त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल़े
सीतारामच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी पोलिसांना कोणतीही कल्पना न देता अंत्यसंस्कार केल़े दरम्यान भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दुर्वास पाटील व विश्वास पवार यांनी सीताराम याचा खून केल्याची कबुली शहर पोलिसाना दिल़ी या प्रकरणी दुर्वास पाटील, विश्वास पवार व राकेश जंगम या तिघांविऊद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल़ा भक्ती मयेकर खून प्रकरणात शहर पोलिसांची कोठडी संपल्यानंतर दुर्वास व विश्वास पवारची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होत़ी
वाटद-खंडाळा येथील तिहेरी खून प्रकरणातील जयगड पोलिसात दाखल करण्यात आलेले सीताराम वीर व राकेश जंगम खून प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आह़े सीताराम वीर खून प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दुर्वास पाटील व विश्वास पवारला अटक करण्यात आली आह़े 17 सप्टेंबर रोजी पुन्हा संशयितांना न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याने पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार, याकडे लक्ष लागून राहिले आह़े








