वार्ताहर/हलशी
घटस्थापना ते अष्टमीपर्यंत दुर्गादेवीची विविध रूपात नऊ दिवस नवरात्रीमध्ये पूजा उपासना केली जाते. गुंडू हलशीकर व रेणुका हलशीकर यांच्या हस्ते देवीची दुर्गा अष्टमीला पहाटे अभिषेक, पूजा, आरती करण्याची प्रथा आहे. यानुसार पहाटे पूजन करण्यात आले. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. नरसिंह पाटील व मानकरी यांच्यावतीने देवीला गाऱ्हाणा घालण्यात आला. त्यानंतर गुंडू हलशीकर यांच्या हस्ते भगवा ध्वजाचे पूजन करून दुर्गामाता दौडची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, बाळगोपाळ, तरुण युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते व धारकरी उपस्थित होते.









