युवक-युवतींसह बालचमूंचा सहभाग : सर्वत्र चैतन्याचे वातावरण : दौडीत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा जयघोष
खानापूर : शिवप्रतिष्ठानच्यावतीने सुरू असलेल्या दौडची तिसऱ्या दिवशीही शिवस्मारक येथील शिवमूर्तीची पूजा मारुती गुरव आणि विनायक कदम यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर दौडीच्या ध्वजाची पूजा कऊन दौडीला प्रारंभ करण्यात आला. ही दौड शिवस्मारक, आश्रय कॉलनी, वर्दे कॉलनी, श्री गणपती मंदिर हायवे, श्री बसवेश्वर स्मारक, शिवाजीनगर, समर्थनगर, श्री मऱ्याम्मा मंदिर, गांधीनगर, श्री दुर्गादेवी मंदिर, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, हलकर्णी येथे सांगता करण्यात आली. दौडीत मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या जयघोषात तसेच भक्तीगीत, भजन म्हणत दौड पुढे जात होती. आश्रय कॉलनी, वर्दे कॉलनी या ठिकाणी दौडीचे स्वागत करण्यात आले. गणपती मंदिर व बसवेश्वर स्मारकावर पूजन करण्यात आले. यानंतर गांधीनगर, हलकर्णी येथे दुर्गा दौडीचे स्वागत करण्यात आले. हलकर्णी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात देवीच्या आरतीने दौडची सांगता झाली.
दौडीचा गुरुवारचा मार्ग
गुरुवार दि. 19 रोजी शिवस्मारक, न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनगर, घोडे गल्ली, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री दत्त मंदिर, अर्बन बँक श्री दुर्गादेवी, श्ऱी राम मंदिर, श्री पंचमुखी महादेव मंदिर, श्री हरीबोल मंदिर, भट गल्ली, श्री बालाजी मंदिर, रविवार पेठ, श्री लक्ष्मी गदगा, चौराशी गल्ली, श्री चौराशीदेवी मंदिर येथे सांगता.
ओलमणी येथे दुर्गामाता दौडला वाढता प्रतिसाद
वार्ताहर /जांबोटी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रविवारपासून ओलमणी येथे दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. या दौडीला गावातील युवा वर्गांचा तसेच बालचमूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. या दौडीमुळे युवा वर्गामध्ये नवचैतन्य पसरले आहे. रविवार दि. 15 रोजी सकाळी 5.30 वाजता माऊती मंदिरपासून या दौडीला प्रारंभ करण्यात आला. युवा कार्यकर्ते किरण साबळे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक सुतार यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन व विमा प्रतिनिधी संजय बैलूरकर यांच्या हस्ते विविध शस्त्रांचे पूजन करून या दौडचा शुभारंभ करण्यात आला. रोज पहाटे 5.30 वाजता दौडीला प्रारंभ होऊन ही दौड माऊती गल्ली, भवानी गल्ली, पांडुरंग गल्ली, सरस्वती गल्ली, मऊबाई गल्ली, हरिजन गल्ली, बस स्थानक परिसर आदी ठिकाणी फिरून दौडीची सांगता रोज वेगवेगळ्या मंदिरमध्ये करण्यात येत आहे. ओलमणीमध्ये गेल्या 11 वर्षांपासून दौडचे आयोजन करण्यात येत आहे. या दौडला गावातील युवक-युवती तसेच बालचमूंचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. गावातील सुवासिनी दौडीमध्ये सहभागी युवकांचे पंचारती ओवाळून औक्षण करीत आहेत. तसेच या दौडीत सहभागी युवक जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय, दुर्गामाता की जय आदी घोषणा तसेच देशभक्तीपर गीतांनी परिसर दणाणून सोडीत असल्यामुळे गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे. दौड यशस्वी करण्यासाठी पिंटू नावलकर, हणमत जगताप, राजू चिखलकर, प्रभाकर साबळे, विलास सुतार आदी परिश्र्रम घेत आहेत. या दौडीत गावातील युवक, युवती व बालचमू मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विजयादशमी दिवशी या दौडीची सांगता होणार आहे.









