वार्ताहर/काकती
होनगा (बेन्नाळी) येथे घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडला जल्लोषी वातावरणात प्रारंभ झाला. दौडीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. हजारेंच्या संख्येने वारकऱ्यांच्या सोबत तरुण, युवा-युवती सहभागी झाले होते. शिवाजी महाराज स्मारकापासून दौडीची सुरवात प्रेरणामंत्राने झाली. हभप शिवाजी आनंदाचे यांच्या हस्ते ध्वज चढविला. प्रत्येक गल्लीत रांगोळ्या व फुलांच्या आरासमुळे मंगलमय वातावरण तयार झाले होते. राजाराम गल्ली, नेताजी गल्ली, बलभीम गल्ली, जोतिबानगर, शांतीनगर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, आंबेडकर गल्ली, कल्मेश्वरनगर, लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली, कचेरी गल्ली, भैरवनाथ रोड, धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर ध्वज उतरविला. ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली. ठिकठिकाणी महिला सुवासिनींनी दौडीचे स्वागत करून औक्षण केले.









