वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडला गुऊवारी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून प्रेरणामंत्राने दौडीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून जात विविध मंदिरांना भेटी देण्यात आल्या. दौडीमुळे गावात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून दररोज युवक युवतींची संख्या वाढतच आहे. युवक व युवती पारंपरिक वस्त्रs परिधान करून दौडमध्ये सहभागी होत आहेत. दौडमध्ये विविध देवीदेवतांच्या घोषणा देण्यात येत असून स्फूर्तीगीतेही गाण्यात येत आहेत.









