बेळगाव : अनगोळ येथील कलमेश्वर बैलगाडा युवा शर्यत कमिटीच्या वतीने आयोजित बैलगाडा शर्यतीत श्री दुर्गादेवी प्रसन्न मालापुर-चिक्कमलिकवाडने 2015 फूट अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला. अनगोळ शिवारातील रिंग रोड येथे शनिवार व रविवारी ही शर्यत झाली. हजारो शर्यतप्रेमी व शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. शनिवारी दुपारी या शर्यतीचे उद्घाटन मुहूर्ताच्या बैलजोड्या पळवून गावातील प्रगतशील शेतकरी बांधव, लोकप्रतिनिधी तसेच सामाजीक कार्यकर्ते व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन. बैलगाडा पुजन करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक तसेच सावंतवाडी, कुडाळ येथून देखील बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये पहिला क्रमांक श्री दुर्गादेवी प्रसन्न मालापुर-चिक्कमलिकवाड 2015 फूट, दुसरा माऊली प्रसन्न बेळगुंदी-बेळवट्टी 2011, तिसरा शिवाजी मल्लेशी कणबरकर-मुतगा 2007-08, चौथा दुर्गमादेवी प्रसन्न डेंबोळी, 1981-10, पाचवा कालिकादेवी प्रसन्न एम. के. हुबळी-सुळगा 1981-04, सहावा महालक्ष्मी प्रसन्न मुचंडी-मुरकटवाडी 1976, सातवा परशराम मल्लाप्पा पाखरे वडगाव 1975-07, आठवा नारायण कारवेकोप-मोदेकोप 1975, नववा कलमेश्वर प्रसन्न सावगाव-आजरा 1969-1, दहावा जय हनुमान प्रसन्न मुतणमरी-कुरणकोप 1968-04, अकरावा बसवेश्वर प्रसन्न-जोडली 1967-04, बारावा कलमेश्वर प्रसन्न अनगोळ 1952-03,
तेरावा ग्रामदेवी प्रसन्न बैलूर-हावेरी 1951-03, चौदावा सिध्दारूढ प्रसन्न हाके हुबळी-इस्लामपूर 1950-01, पंधरावा अंजनेय प्रसन्न भेंडीगेरी-मुतगा 1946-08, सोळावा अंजनेय प्रसन्न अलारवाड-तुर्केवाडी 1937, सतरावा कलमेश्वर प्रसन्न सांवगाव 1934-06, अठरावा कलमेश्वर प्रसन्न कडोली-कुडाळ 1931-11, ऐकोणीसावा वसंत खोबाण्णा डुकरे किणये 1928-10, विसावा कलमेश्वर प्रसन्न सांवगाव 1925-06, एकविसावा रामलक्ष्मण सिध्देश्वर प्रसन्न राजहंसगड-वाघराळी या बैलजोड्यांनी 1925-04 फूटाचे अंतर कापुन क्रमांक पटकाविला. तसेच एकतीसावा लक्की सिद्धेश्वर प्रसन्न केदनुर 1894-00, एक्केचाळीसवा लक्की क्रमांक रवळनाथ प्रसन्न निठ्ठूर 1841-07 या बैलजोड्यांनी फटकावला.
यावेळी प्रमुख पाहुणे अनगोळ कृषी पतीन सोसायटीचे चेअरमन व प्रगतशील शेतकरी मनोहर बडमंजी,सोमेश्वर दुध डेअरीचे संचालक केदारी जाधव, पद्मा हार्डवेअरचे संचालक प्रतिक गुंडप्पणावर, रवी पाटील, दीपक सोमनाचे, महावीर सातगौड्डा, यल्लाप्पा पाटील, रवी धाकलुचे, आनंद पाटील, सुनिल कलकुप्पी, अमित पुजारी, अशोक हणमण्णावर, चेतन यल्लमण्णावर, मोहन खन्नुकर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बैलजोडी मालकांना रोख पोरितोषीक सन्मानचिन्ह व फेटा देऊन गौरविण्यात आले. यावेळी देणगीदार व प्रतिष्ठित नागरीकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शर्यतीचे धावते समालोचन भरत कांबळे गडहिंग्लज, भावेश बिर्जे, मोहन खन्नुकर, सुनिल पाटील यांनी केले.









