शहरातील विविध मार्गावरुन दौडीचे आगमन
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दुर्गादौडीचे रविवार दि. 15 ते मंगळवार दि. 24 ऑक्टोबरपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. दुर्गामाता दौडला सकाळी 5.30 वाजता सुरवात होऊन 7.30 वाजता सांगता होणार आहे.
दौडचा उद्याचा मार्ग
रविवार दि. 15 रोजी श्री शिवस्मारक, निंगापूर गल्ली, श्री लक्ष्मी मंदिर, चिरमुरकर गल्ली, कडोलकर गल्ली, पेंचापूर गल्ली, श्री चौराशी मंदिर, पारिश्वाड क्रॉस, दादोबानगर, बाजारपेठ, श्री संभाजी महाराज स्मारक, घाडी गल्ली, गुरव गल्ली, बस्ती गल्ली, श्री कलमेश्वर मंदीर, श्री सातेरी माऊली मंदिरात सांगता. होणार आहे.
तालुका दक्षिण विभागातील गावात दौडीचे नियोजन करण्यात आले असून यात नंदगड परिसरातील 40 गावातून दौडीचे नियोजन करण्यात आले असून याबाबत गाव पातळीवर बैठका घेऊन दौडीचे नियोजन करण्यात आले आहे. दि. 15 पासून दौडला सुरवात होणार असून नंदगड परिसरातील गावातून दररोज दौड पहाटे 5.30 वा. सुरु होणार असून सकाळी 7 वाजता दौडची सांगता होणार आहे. दौडीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दक्षिण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.