वार्ताहर/मजगाव
मजगाव येथे दुर्गामाता दौड शुक्रवारी उत्साहात काढण्यात आली. यावेळी येथील पंतस्थळ येथील देवालयासमोरुन शस्त्रपूजन व देवांचे पूजन करून दुर्गामाता दौड प्रारंभ झाला. यावेळी दीपक सातगौडा व उद्यमबाग पोलीस स्टेशनचे सीपीआय यांच्या हस्ते दौडीचे उद्घाटन झाले. यावेळी विविध घोषणा देत दौडला प्रारंभ झाला. दौड मजगावातील उपनगरांतून जावून संपूर्ण मजगावात फिरुन ब्रह्मदेव मंदिरासमोर सांगता झाली. यावेळी सर्वत्र भगवेमय वातावरण होते. प्रत्येक गल्लीत जल्लोषात फटाके वाजवून पुष्पवृष्टी करून औक्षण करून स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने लहान, थोर मंडळी सहभागी झाली होती.









