दुर्गादौडीच्या माध्यमातून शिवरायांचा जागर : व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश
मण्णूरमध्ये भरघोस प्रतिसाद
वार्ताहर/हिंडलगा
मण्णूर येथील दुर्गामाता दौडीला घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. दौड हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या माध्यमातून होत आहे. दौडीद्वारे गावाला शिवरायांचा जागर करण्याचा संदेश व युवकांना व्यसनमुक्तीसाठी जागृती यावर भर दिला आहे. दौडला युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून, बालगोपाळांचाही सहभाग मोठा आहे. गावातील प्रमुख गल्ल्यामधून दौड पहाटे फिरत असून सर्वत्र स्वच्छता राखून फुलांची उधळण केली जात आहे. ठिकठिकाणी दुर्गादौडीचे स्वागत होत असताना मराठ्यांचा इतिहास व गड किल्ल्यांची माहिती दिली जात आहे. तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त करण्यावर भर दिला आहे. गावातील मध्यवर्ती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले जात असून, शिवरायांचा जयघोष करत परिसर दुमदुमला जात आहे.









