वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे दुर्गामाता दौडमुळे गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दररोज दौडची सुरुवात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रेरणामंत्राने करण्यात येत आहे. त्यानंतर सर्व गल्ल्यातून दौड मार्गक्रमण करत आहे. यावेळी स्फूर्तीगीते गाण्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण भक्तिमय होत आहे. दौडमध्ये दररोज कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे. सर्वजण पारंपरिक पोषाख परिधान करून सहभागी होत आहेत. गावातील सर्व मंदिरांनाही भेटी देण्यात येत आहे.









