वार्ताहर/हिंडलगा
येथील दुर्गा दौडीचा शुभारंभ घटस्थापनेपासून केला. दौड विविध उपनगरात काढली. पहाटे 6 वाजता रामदेव गल्ली येथील शिवरायांच्या मूर्तीच्या पूजनानंतर दौडीला प्रारंभ होतो. शुक्रवार दि. 26 रोजी दौडीचे स्वागत सोमनाथ नगर शिवराज कॉलनीतर्फे महिला वर्गातर्फे केले. दौडनिमित्त सर्वत्र आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.भगव्या ध्वजाचे पूजन येथील महिलांतर्फे करण्यात आले. महिलांमध्ये संगीता बेंद्रे, भारती कोकितकर, हेमा पाटील, धनश्री गुरव, संगीता पलंगे (ग्रा. पं. सदस्या), इंदिरा भोगण, राजश्री हसबे, निकीता पावशे यांचा सहभाग होता. दौडीची सांगता मष्णाई देवी मंदिरासमोर केली. दौड लक्ष्मी गल्लीतून बेळगाव वेंगुर्ला रोड, मांजरेकर नगर, कलमेश्वर नगर भागात काढली.









