वृत्तसंस्था/ बर्लिन
2025 च्या अॅथलेटिक्स हंगामातील येथे शुक्रवारी झालेल्या पहिल्या आयएसटीएएफ इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धेत स्वीडनचा पोलव्हॉल्टर आर्मंड डुप्लेंटीसने नवा स्पर्धा विक्रम नोंदविला.
डुप्लेंटीसने पोलव्हॉल्ट या क्रीडा प्रकारात 6.10 मी. ची नोंद करत यापूर्वी म्हणजे गेल्या ऑगस्टमध्ये पोलंडमध्ये झालेल्या इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धेतील स्वत: चाच नोंदविलेला 6.27 मी. चा विश्व आऊटडोअर विक्रम मोडित काढता आला नाही. 25 वर्षीय डुप्लेंटीसने पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना या क्रीडा प्रकारात 6.25 मी. ची नोंद केली होती. डुप्लेंटीसने आतापर्यंत दोन वेळेला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.









