पुणे / वार्ताहर :
भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) स्कुल ऍन्ड सेंटर, पुणे यांचे वतीने एमएसडब्ल्यू कुक, ग्रुप सीच्या पदासाठी फिजीकल, मेडीकल टेस्ट परीक्षेत एका परीक्षार्थी ऐवजी दुसऱ्या परीक्षार्थीने परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन जणांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुष्पेंद्रकुमार किसनालाल (वय 22, रा. हाथरस, उत्तरप्रदेश) याच्यासह एका अनोळखी तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बआरओ तर्फे असिस्टंट एस.एन.वर्मा (वय 52) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकार 21 जून 2023 रोजी धानोरीतील ग्रीफ, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन स्कूलमध्ये घडला आहे. आरोपी पुष्पेंद्रकुमार किसनालाल याने बीआरओ स्कुल ऍन्ड सेंटर यांचे वतीने एमएसडब्ल्यू कुक, ग्रुप सीच्या पदासाठी फिजीकल मेडिकल टेस्ट परीक्षेत त्याच्या ऍडमिट कार्डवर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावून परीक्षेत त्या व्यक्तीला बसवून दोघांनी केंद्र सरकारची व बीआरओची फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन राठोड करत आहेत.








