सातारा प्रतिनिधी
आज आषाढी एकादशी निमित्त सातारा जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी धामणेर येथे भाविकांनी मोठी केली आहे…आषाढी एकादशी निमित्त ज्याला पंढरपूर ला जाता येत नाही यासाठी संत गाडगेबाबांनी ज्याला घडेना पंढरी त्याने यावे ब्रम्हपुरी संदेश दिला होता. विठुरायाच्या भेटीला पंढरपूरला जाऊ शकले नाही असे भाविक ब्रह्मपुरी येथील विठुरायाचे दर्शन घेऊन धन्य होत आहेत. आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. टाळ मृदंगाच्या गजरात विठू माऊलीच्या नामस्मरणात सारा परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला आहे.
आषाढी एकादशी वारकरी दिंडीने रत्नागिरीत भाविकांमध्ये उत्साह
रत्नागिरी शहरात आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीला रत्नागिरीकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील मारुती मंदिर सर्कल ते प्रतीक पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन या वारकरी दिंडी दिंडीचा समारोप झाला. टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामा चा जयघोष करत काढण्यात आलेल्या या दिंडीमुळे वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. हातात भगवे ध्वज, डोक्यावर टोपी, कपाळी टिळा आणि वारकरी पेहरावात बहुसंख्येने रत्नागिरीकर सहभागी झाले होते.