मध्य-पूर्व विभागामध्ये सलामीची लढत बेंगळुरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या क्रिकेट हंगामातील दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेला 28 जूनपासून बेंगळूरमध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत पूर्व विभाग आणि मध्य विभाग यांच्यातील सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. तसेच स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उत्तर विभाग आणि उत्तर-पूर्व विभाग यांच्यात दुसरा सामना होणार आहे.
मध्य विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील सलामीचा सामना अलूर क्रिकेट स्टेडियमवर तर उत्तर विभाग आणि पूर्व विभाग याच्यातील सामना बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. गेल्या वर्षीच्या क्रिकेट हंगामात पश्चिम विभाग हा विद्यमान विजेता असून दक्षिण विभाग हा उपविजेता संघ होता. या स्पर्धेत विद्यमान विजेता पश्चिम विभाग आणि उपविजेता दक्षिण विभाग यांना यावेळी उपांत्य फेरीसाठी थेट प्रवेश देण्यात आले असून या स्पर्धेतील अंतिम सामना 12 जुलैला चिनास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
पश्चिम विभाग संघ- प्रियांक पांचाळ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, हर्विक देसाई, पृथ्वी शॉ, हेट पटेल, सरफराज खान, ए. वासवदा, अतित सेट, मुलानी, युवराज दोडिया, डी. जडेजा, चेतन साकारिया, चिंतन गजा, ए. नागवासवाला.
दक्षिण विभाग- हनुमा विहारी (कर्णधार), मयांक अगरवाल, साईसुदर्शन, रिकी भुई, के. एस. भरत, आर. समर्थ, वॉशिंग्टन सुंदर, सचिन बेबी, रंजन पॉल, साईकिशोर, कविरप्पा, विशाख, शशीकांत, दर्शन मिसाळ, तिलक वर्मा.
पूर्व विभाग-अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), शाहबाज नदीम, एस. मिश्रा, सुदीप घरमी, रियान पराग, ए. मुजुमदार, बी. सौरभ, ए. पोरल, कुशाग्र, शाहबाज अहमद, मुकेश कुमार, आकाशदीप, अंकुल रॉय, मुरा सिंग, इशान पोरल.
उत्तर विभाग-मनदीप सिंग (कर्णधार), प्रशांत चोप्रा, शोरे, मनन होरा, प्रभसिमरन सिंग, अंकितकुमार, ए. एस. कालसी, हर्षित राणा, अबिब मुस्ताक, जयंत यादव, पी. नारंग, निशांत संधू, सिद्धार्थ कौल, अरोरा आणि बालतेज सिंग.
मध्य विभाग-शिवम मावी (कर्णधार), उपेंद्र यादव, विवेक सिंग, एच. मंत्री, कुणाल चंडेला, शुभम शर्मा, अमनदीप खरे, रिंकू सिंग, अक्षय वाडकर, डी. जुरेल, सौरभ कुमार, मानव साथर, सारांश जैन, आवेश खान, यश ठाकुर.
उत्तर-पूर्व विभाग – आर जोनाथन (कर्णधार), एल. निलेश, एल. किशन, लेंगलोनांबा, अलवात, एल. जोसेफ, प्रफुल मनी, डी. संगमा, पी. जोतीन, आय. लेमतूर, पी. एमांग, किशन सिन्हा, आकाशकुमार चौधरी, राजकुमार रेक्ससिंग, एन. चिसी.









