वेलिंग्टन : चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संयुक्त अरब अमिरात विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात टिकनेरच्या जागी जेकॉब डफीला संधी देण्यात आली आहे. कांही कौटुंबीय समस्येमुळे टिकनेर या मालिकेत सहभागी होऊ शकणार नसल्याने क्रिकेट न्यूझीलंडने डफीला संधी दिली आहे. न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरीस्टेड यांनी ही माहिती दिली. उभय संघातील होणाऱ्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 17 ऑगस्टला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.
न्यूझीलंड संघ – टीम साउदी (कर्णधार), आदी अशोक, बोवेस, चॅपमन, क्लेव्हर, डफी, फॉक्सक्रॉफ्ट, जेमिसन, लिस्टेर, मॅकोंची, निश्चाम, रचिन रविंद्र, सँटेनर, सिफर्ट आणि यंग.









