विविध कंपन्यांकडून नोंदवली जात आहे माहिती ः नागरिकांचा ओढा ईव्हीकडे वाढतोय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सलगपणे वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण आता पर्यावरणासह अन्य मुद्दे मोठय़ा प्रमाणात चर्चेत येत असल्यामुळे लोकांचा ओढा ईव्ही वाहनांकडे वाढतच आहे. मागील पाच महिन्यातील आकडेवारी पाहिल्यास यामध्ये ईव्हीची विक्री ही वेगाने वधारत आहे. आर्थिक वर्षात ईव्हीची विक्री ही एक दशलक्ष युनिटचा आकडा पार करणार असल्याचा इलेक्ट्रिक कार कंपन्यांना विश्वास वाटतो आहे.

मागील वर्षातील तुलना केल्यास यामध्ये जवळपास 84 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार तीनचाकी वाहनाची विक्री ही 200,000 युनिटपर्यंत पोहोचली आहे. ईव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आणि एमजी मोटर्स या दोन प्रमुख कंपन्या समोर आल्या असून यांची विक्री ही तब्बल 138 टक्क्यांनी वाढली आहे. यात दुचाकींची विक्री ही 117 टक्क्यांपर्यंत वधारुन ती 750,000 युनिटच्या घरात पोहोचली आहे.
जागतिक बाजाराच्या तुलनेत भारत
ईव्ही सेगमेंटमध्ये जर का जागतिक बाजाराच्या तुलनेत भारताची स्थिती पाहिल्यास यामध्ये भारत खूप मागे असल्याचे दिसून येत आहे. ईव्हीच्या क्षेत्रात दीर्घ कालावधीची योजना तयार करावी लागणार आहे. जागतिक पातळीवर दुचाकीची आकडेवारी ही फक्त 3 टक्के इतकीच आहे. त्यामुळे आगामी दोन्ही सेगमेंटमधील विक्री वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जाणे जरुरीचे असणार आहे. आगामी दोन वर्षांत विविध कंपन्या आपल्या ईव्ही दुचाकींसह अन्य वाहनांची निर्मिती करण्यावर भर देणार आहेत.









