प्रतिनिधी /बेळगाव
आरपीडी कॉर्नर येथे रस्त्यावर सापडलेले पैशांचे पाकीट मेहनत घेऊन एका तरुणाने संबंधित व्यक्तीकडे पोहोचविले आहे. नुकताच बारावी उत्तीर्ण झालेल्या शिवप्रसाद माळी याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरपीडी कॉर्नर परिसरात शिवप्रसाद याला पैशांचे पाकीट मिळाले. त्यामध्ये 5 हजार रुपये रोख रक्कम व एटीएम कार्ड होते. पाकिटात मिळालेल्या हॉस्पिटलच्या चिठ्ठीवरून मालक प्रवीण धामणेकर यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. मालकाचा शोध घेण्यामध्ये सुशांत कुलकर्णी व शिवसेनेचे अरविंद नागनुरी यांनी मदत केली. पाकीट देतेवेळी माणिक गुंडपन्नावर, राजू सावंत यासह इतर उपस्थित होते.









