काही तालुक्यांमध्ये मोजकीच कामे : खात्रीतील कामगारही उतरले प्रचारात : अनेक रोजगारांना काम देण्यासाठी करावी लागतेय कसरत
बेळगाव : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्योगखात्री योजनेतील कामांनाही संथगती मिळाली आहे. निवडणुकीमुळे उद्योग खात्री योजनेतील कामे रेंगाळली आहेत. मोजक्याच तालुक्यांमध्ये ही कामे सुरू आहेत. तर काही कामगारही आता निवडणुकीच्या प्रचारात उतरल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी निवडणुकांमुळे अनेक रोजगारांना काम देण्यासाठी अधिकाऱ्यांचा मोठा कस लागत आहे. त्यामुळे कधी एकदा निवडणूक संपते असेच साऱ्यांना वाटू लागले आहे. मागील काही वर्षे उद्योग खात्रीमध्ये जिह्याने उद्दिष्टापेक्षाही अधिक कामे केली होती. मात्र आता मागील दोन वर्षांपासून सरकारकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मागील चार वर्षांपूर्वी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये ग्राम पंचायतींनी उत्स्फूर्तपणे विविध कामे करून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या उद्योग खात्री योजनेचा लाभ घेत होती. आता मात्र रोजगारांना कामे कोणती द्यावी या विवंचनेतच अनेक तालुका पंचायत अधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे. यातच निवडणूक आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामांमध्ये गुंतविण्यात आल्याने उद्योगखात्री योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
उद्योगखात्री योजनेंतर्गत दिलेले लक्ष्य कधी पूर्ण करणार ?
केंद्र सरकारने महात्मा राष्ट्रीय ग्रामीण उद्योग सुरू केला आहे. तो प्रभावीपणे राबविला जात आहे. त्यामुळे देशभरातच याचा गवगवा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्यात आता निवडणुकांचे वारे जोमाने वाहू लागल्याने अनेक जण निवडणुकीमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे. उद्योगखात्री योजनेंतर्गत दिलेले लक्ष्य जिह्यात पूर्ण केले. असले तरी 2023-24 सालासाठी देण्यात आलेले लक्ष कधी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान निवडणुका संपल्यानंतर जूनमध्ये पावसाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूक कामात अधिकाऱ्यांना गुंतविल्याने समस्या
जिह्यात कोट्यावधी ऊपयांची अधिक कामे करण्यात आली होती. आता मात्र सर्वच ग्राम पंचायतमधून कामे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे काही रोजगार वारंवार आंदोलन आणि निवेदने देत असतात. मात्र काही ग्राम पंचायतींमधील सर्वच कामे पूर्ण झाल्याने कोणती कामे द्यायची? असा प्रश्न उपस्थित केला जात असतो. दरम्यान निवडणुकींच्या कामामध्ये अधिकाऱ्यांना गुंतविण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कामगारांना काम देण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे.
निवडणूक कामाला अधिकारी-कर्मचारी वैतागले
राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्रीतर्फे ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व गावपातळीवर विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना राबवितानाच विविध तलावे, स्वच्छ भारत अभियान, रस्ते, गटारी यासह इतर कामांचा या योजनेत समावेश आहे. मात्र अधिकारीच नसल्याने कामे तरी कोणती देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान काही ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात उद्योग खात्रीची कामे सुरू आहेत. मात्र काही कामगारांना काम मिळत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे कधी एकदा निवडणूक संपते? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.









