Due to social commitment organization, the old lady who missed the waiting got her way home…!
कुडाळ येथील प्रमिला राऊळ (वय वर्ष 57) ही वृद्ध महिला आपल्या घरची वाट चुकून 23 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता सावंतवाडी -वेंगुर्ला बस स्टॉपच्या समोरील रस्त्यावर बसून आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होती . याची माहिती कृषी साहित्य विक्रेते कौस्तुभ यादव यांनी सामाजिक बांधिलकीला दिली असता सामाजिक बांधिलकीची टीम तत्काळ सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॉपवर पोहचली व सदर महिलेला तिच्या घरचा पत्ता विचारला असता सुरुवातीला ती काहीच बोलत नव्हती . खूप प्रयत्नानंतर आपण ओटवणे येथे राहते असं सांगितले. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी पोलीस स्टेशनला फोन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद व बाबू तेली यांची मदत घेतली व सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध लावला. महिलेचे नातेवाईक कुडाळ येथे राहतात हे समजताच पोलीस बाबू तेली यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांना सावंतवाडी येथे बोलावलं.कुडाळ वरून तिचे नातेवाईक रात्री 11 वाजता सावंतवाडी येथे पोचले तोपर्यंत रात्री 8 ते 11 पर्यंत सामाजिक बांधिलकीची टीम त्या महिलेसोबत होती.सामाजिक बांधिलकीच्या टीमने महिलेला नातेवाईकांच्या स्वाधीन केले असता तिच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकी व पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले.याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पेडणेकर, समीरा खालील, आमीन खलील, कौस्तुभ यादव व पोलीस तेली व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









