भुईंज :
बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक यांना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागले. यात बुधवारी सायंकाळी ५ वाजता भुईंज येथे सातारचे दिशेने येणारी कार पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पलटी होऊन दुभाजकाबर आदळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
या दरम्यान भुईंज येथील तरुण व्यापारी सूरज लोखंडे व त्यांच्या मित्र परिवाराने मदतकार्य दिले. घटनास्थळी भुईंज पोलीस व महामार्ग पोलीस हजर होऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, महामार्गावरील खड्डे मुजवण्याची मागणी होत आहे.








