जमिनीमध्ये पडू लागल्या भेगा : नांगरणीची कामे पडली लांबणीवर : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
वार्ताहर /किणये
य् ाावर्षी तालुक्यात वळीव पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेत शिवारातील पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. मे महिन्याला सुरुवात झाली असून अद्यापही शिवारात नांगर फिरविणे बाकी आहे. तसेच मशागतीची कामे करायची कधी, यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. य् ाsत्या पंधरा दिवसानंतर तालुक्यात दरवर्षीच्या हंगामानुसार धूळवाफ पेरणीला सुरुवात करण्यात येते. मात्र बहुतांशी शेतशिवारात मशागतीची कामे झालेली नाहीत. गेल्या दहा-बारा दिवसापूर्वी वळिवाचा केवळ शिडकावा झाला. तर बहुतांशी भागात वळीव पडलाच नाही. यामुळे शेतातील जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहेत. तालुक्यात खरीप हंगामामध्ये भात, बटाटा, रताळी, भुईमूग, नाचणा आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. कोणत्या शेतशिवारात कोणते पीक घ्यायचे याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात शेणखतही आणून ठेवले आहे. पण वळीव पाऊस नसल्यामुळे शेतात नांगरण झाली नाही, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे.
पावसाअभावी कामांना ब्रेक
वळीव पाऊस झाल्यास शेतात नांगरण करून मशागत करण्यास सोयीस्कर होते. पण पावसाअभावी या मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे सध्यातरी शेतकरीवर्ग वळिवाचा पाऊस कधी पडणार याची वाटू पाहू लागला आहे.
सध्यातरी वळिवाच्या पावसाची नितांत गरज

य् ाा भागातील आम्हा लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतातील पिकाच्या उत्पादनावरच आमचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. शिवारात काम करीत असताना तसेच वेगवेगळी पिके घेत असताना हंगामानुसार कामे झाल्यास पेरणी व लागवड करताना धावपळ होत नाही. धूळवाफ पेरणी करण्यासाठी अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. वळिवाचा पाऊस झाला नाही यामुळे मशागतीची कामे झाली नाहीत. सध्यातरी वळिवाचा पाऊस हा आम्हा शेतकऱ्यांसाठी होणे गरजेचे आहे.
– रामा जाधव, कावळेवाडी









