बेळगाव – एस पी एम रोड, ओव्हर ब्रिजच्या शेजारील ओम हॉस्पिटलला लागून असलेली गटर गेल्या महिन्यापासून दुरुती करीता खोदण्यात आले असून, महिना उलटला तरी कामं पूर्ण झाले नाही. अशा वेळी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना याचा त्रास होतं असून, दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. येथील गटरचे बांधकाम लवकर पूर्ण झाले नाहीतर गंभीर दुर्घटना घडू शकते. तरी याकडे संबंधितांनी त्वरित लक्ष घालून येथील काम पूर्ण करावे असे येथील नागरिकांच्या कडून विनंती करण्यात येत आहे.
Previous Articleचीन,जपान मधून येणाऱ्यांसाठी कडक निर्बंध, RT-PCR बंधनकारक
Next Article कोलगाव येथे विवाहितेची आत्महत्या









