वीजतारा तुटल्यामुळे मुलीचा मृत्यू, पावसाचा जोरही वाढला
► वृत्तसंस्था/ जयपूर
बिपरजॉयच्या प्रभावामुळे राजस्थानच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. बिपरजॉय चक्रीवादळ शुक्रवारी रात्री राजस्थानमध्ये पोहोचले. त्याचा प्रभाव राज्यात रविवारपर्यंत राहील. वादळाच्या प्रभावामुळे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस सुरू झाला आहे. राजस्थानमध्ये ‘बिपरजॉय’ जीवघेणे ठरू लागले असून शनिवारी सकाळपासून बारमेर, माउंट अबू, सिरोही, उदयपूर, जालोर, जोधपूर आणि नागौरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत होते. बाडमेरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिह्यातील परिस्थिती पाहता एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अऊण पुरोहित यांनी सांगितले. दुसरीकडे, खराब हवामानामुळे पालीच्या जैतरण पोलीस स्टेशन परिसरात 11 केव्ही वीज तार पडल्याने बंजाकुडी गावातील 16 वषीय पूजा कुमावतचा मृत्यू झाला. या अपघातात एका वासराचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
गेल्या 24 तासांत बिपरजॉयचा सर्वाधिक प्रभाव जालोर, सिरोही आणि बारमेरच्या वाळवंटी जिह्यांमध्ये दिसून आला. माउंट अबूमध्ये विक्रमी 8.4 इंच पाणी पाऊस झाला. जयपूर हवामान केंद्रानेही सिरोही आणि जालोरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्मयता व्यक्त केली आहे. हवामान खात्याने बाडमेर, जालोर, सिरोही आणि पालीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बाडमेरमधून जाणाऱ्या 14 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे उदयपूरहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन उ•ाणेही रद्द करण्यात आली आहेत.









