नगरसेवकांबरोबरच अधिकाऱ्यांनीही केले स्वागत
बेळगाव : महापालिकेच्या आयुक्तपदी अशोक दुडगुंटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी त्यांना नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अशोक दुडगुंटी यांनी अप्परजिल्हाधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून काम पाहिले होते. त्यापूर्वी महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून सेवा बजावली होती. आता पुन्हा त्यांची वर्णी मनपाच्या आयुक्तपदी लागली आहे. त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली असून शहराचा कारभार पाहणार आहेत. शहरामध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. पाणी, कचरा या समस्या दैनंदिन झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आव्हान स्वीकारावे लागणार आहे. याचबरोबर यापुढे सभागृहाचे कामकाजही सुरू होणार असून त्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असून त्यांच्याशी जुळवून घेऊनच त्यांना काम करावे लागणार आहे.









