वृत्तसंस्था / मुंबई
इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी मुंबईचा अष्टपैलु शिवम दुबेचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. नितीशकुमार रेड्डी दुखापतीने जायबंद झाल्याने त्याच्या जागी दुबेला बदली खेळाडू म्हणून घेण्यात आले आहे.
मुंबईचा दुबे 28 जानेवारीला राजकोटमध्ये भारतीय संघात दाखल होईल. उभय संघातील तिसरा टी-20 सामना मंगळवार दि. 28 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून इंग्लंडवर आघाडी मिळविली आहे.









