वसगडे रेल्वे आंदोलनाचा आज पाचवा दिवस
वसगडे / वार्ताहर
पुणे – कोल्हापूर रेल्वेचे दुहेरीकरण करताना शेतकऱ्यांच्या हद्दीत रूळ टाकल्याने सुरू असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी आज भेट दिली. माजी सांगली जि.प. अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या भुमिकेला पाठिंबा दिला. स्थानिक पातळीवर प्रश्न नाही सुटल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करू असे आश्वासन दिले.
आ.मोहनशेठ कदम यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची पाठिंबा दर्शविला. त्याचबरोबर माजी पं. स.सदस्य स्वाभिमानी शेतकरी चे आघाडीचे नेते संदीप राजोबा यांनी रेल्वे विरोधी आंदोलनाका सोबत आम्ही आहोत. माजी खा.राजू शेट्टी ही या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहतील अशी ग्वाही दिली. ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार, प्रांत ऑफिस,भूमी अभिलेख व रेल्वे बाधीत शेतकरी यांच्यासमोर संयुक्त मोजणी होणार आहे.
त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पाच मीटरचा रस्ता व एक मीटरचे गटर कटिंग धरून रस्त्याची मोजणी करण्याचे प्रांत ऑफिस यांनी मान्य केले असल्याचे प्रितम पाटील यांनी सांगितले. यावेळी क्रांती कारखान्याचे संचालक संजय पवार, धन्यकुमार पाटील, विलास सूर्यवंशी राजू खोत,दत्तात्रय भंडारी, मधुकर परीट, श्रीकांत चौगुले आदी उपस्थित होते.
आंदोलन स्थळी स्व. पतंगराव कदम यांची आठवण.
गेल्या तीन वर्षापासून रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे वसगडेतील शेतकरी अस्वस्थ आहेत. रेल्वेच्या गुन्हे दाखल करण्याच्या भीतीमुळे आवाज उठवला नव्हता.परंतु आठ एकर जमीनीवर रेल्वेने जबरदस्तीने रुळ टाकले. यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभा केला.
गत दहा महिन्यापासून रेल्वे अधिकाऱ्यांनी चालढकल सुरू केली. गेली चार दिवस आंदोलन सुरू आहे पण रेल्वेने यावर तोडगा काढला नाही. आंदोलन स्थळी मान्यवर राजकीय नेत्यांनी भेट दिली,तोडगा काढण्याचे आश्वासन ही दिले आहे. पण आ.मोहन शेठ कदम यांना मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी आज स्व. पतंगराव कदम असते तर चार तासांत तोडगा काढला असता आठवण करीत खंत बोलून दाखवली.








