वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 प्रकारातील सोमवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती राखता न आल्याने स्पर्धा आयोजकांनी स्पर्धा नियमानुसार रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा कर्णधार फॅफ डु प्लेसिसला 12 लाख रुपयांचा दंड जाहीर केला आहे.
या सामन्यात लखनौ संघाने शेवटच्या चेंडूवर हा सामना थरारकरित्या जिंकला. तसेच या सामन्यात मैदानावर बेशिस्त वर्तन करणाऱ्या अवेश खानला सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले आहे. या सामन्यात विजयी धाव घेतल्यानंतर अवेश खानने आपली हेल्मेट भिरकावली होती. या सामन्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालामध्ये या गोष्टींची नोंद केली होती.









