रत्नागिरी-देवरूख बसमधील प्रकारट; बस थेट शहर पोलीस ठाण्यात
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी-देवरूख जाणाऱ्या एसटी बसमध्ये दारूच्या नशेत धुंद झालेल्या तरूणाने वाहकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास शहरातील जयस्तंभ येथे घडल़ी जयवंत जगन्नाथ मोहिते (40, ऱा देवरूख आगार) असे वाहकाचे नाव आह़े या प्रकरणी मोहिते यांनी मारहाण करणाऱ्या तरूणाविरूद्ध शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी.
देवरूख आगारातील वाहक जयवंत मोहिते हे रत्नागिरी येथून सायंकाळी 4 वाजता सुटणारी रत्नागिरी-देवरूख बस घेवून जात होत़े सोमवारी रत्नागिरी-देवरूख ही बस (एमएच 20 बीएल 3619) रहाटाघर येथून सुटून जयस्तंभ येथे आल़ी यावेळी दारूच्या नशेत धुंद असलेला तरूण या बसमध्ये चढल़ा यावेळी वाहक जयवंत व तरूण यांच्यात बाचाबाची झाल़ी याचा राग मनात ठेवून या तरूणाने जयवंत यांना बेदम मारहाण केल़ी.
बसमध्ये वाहकाला मारहाण होताच बसच्या चालकाने बस थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिरवल़ी दरम्यान वाहक व तरूणात झालेल्या या वादाचा मनस्ताप बसमधील प्रवाशांना सोसावा लागल़ा तर एसटी बस पुन्हा एकदा रहाटाघर येथे नेण्यात आल़ी तर एसटी वाहकाची तक्रार नोंदवण्याची प्रकिया मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत़ी.









