शाहुवाडी प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील पर्यटन स्थळावर जाण्यासाठी व धबधब्यात आनंद लुटण्यासाठी येत असलेल्या हुल्लडबाज व मध्य धुंद अवस्थेतील ‘पर्यटकांना वेळीच आवर घालणं गरजेचं असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्यातून येत आहे .रविवारी सायंकाळी मंगळवार पेठ कोल्हापूर नाका येथे सिनेस्टाईल धूमस चक्रीने चांगलाच तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे .
पावसाळा सुरू झाल्याने अनेक पर्यटक शाहूवाडी तालुक्यातील बर्की ‘ केर्ली ‘ मानोली ‘ पालेश्वर या धरणाकडे जात आहेत .मात्र दुचाकीवरून येणारे कॉलेज वयीन युवकांची मध्य धुंद अवस्थेतील असलेली सवारी नागरिकांना चांगलीच त्रासदायक ठरु लागली आहे .मुख्य रस्त्याबरोबरच रहदारीच्या ठिकाणी मध्य धुंद अवस्थेतील पर्यटक वाहनधारकांना त्रास देत आहेत .अनेक वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत .
सुरू झाली सिनेस्टाईल धुमसचक्री
रविवार 16 जुलै रोजी सायंकाळी मलकापूर येथील मंगळवार पेठ कोल्हापूर नाका या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेतील दुचाकी धारकांनी ट्रक चालकाला विनाकारण मारहाण केली.याचे पडसाद चांगलेच उमटले.काही काळ सिने स्टाईलने सुरू असलेल्या धुमस चक्रीने शहरात वाहतूक कोंडी झाली होती.अनेक वेळा असे मध्य धुंद अवस्थेतील पर्यटक वादास कारणीभूत ठरत आहेत .बराच वेळ चाललेली धमस चक्री अखेर मद्यधुंद झालेले दुचाकी धारक पसार झाल्याने शांत झाली
शहरात चेक नाका महत्वाचा
मलकापूर शहराच्या बाहेर पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा वाहनधारकांची चौकशी केली जात आहे .मात्र शहराबाहेरून येताना चांगल्या अवस्थेत असलेले वाहनधारक शहरात प्रवेश केल्यानंतर नशेने तर्र होत आहेत. व शहरासह अन्य ठिकाणी बेधुंदपणे आपला उदटपणा दाखवत आहेत.याचा परिणाम महिला ‘ नागरिक ‘ अन्य वाहनधारक यांना बसत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने गावाच्या बाहेर चेक नाका न करता शहरातच अशा वाहनधारकांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे.
मध्य धुंद चालकांनी केलेल्या अपघात घटना ताज्या
चार दिवसांपूर्वी अशाच मध्य धुंद अवस्थेतील चालकांने केलेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ‘पुन्हा एकदा अशा अवस्थेतील दुचाकी धारकांच्याकडून होत असलेल्या या हुल्लड बाजीला आता आवर घालणं गरजेचं आहे .तर आठ दिवसापूर्वी अशाच मध्य धुंद अवस्थेतील चार चाकी चालकालास्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केले होते.
एकूणच पावसाच्या कोसळणाऱ्या सरी झेलत मध्य धुंद अवस्थेतील पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता कडक कारवाईचे पाऊल उचलणे गरजेचे आहे.अन्यथा रोजच वादावादीचे प्रसंग घडत आहेत .यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांच्यातून होऊ लागली आहे .









