चालकासह टेम्पो मालकावर गुन्हा
सावंतवाडी –
सावंतवाडी मच्छी मार्केट समोरील रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेल्या दुचाकींना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालकाने जोरदार धडक दिल्याने चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले. जमलेल्या नागरिकांनी टेम्पो अडवून चालकाला ताब्यात घेतले . त्यावेळी टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरॊप उपस्थितांनी केला . तात्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली . हा अपघात मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला . तेथे जिमसाठी आलेल्या हर्षद सुनील मेस्त्री ( २१) झिरंग माठेवाडा ) याने आपली बुलेट त्या ठिकाणी पार्किंग केली होती व अन्य दुचाकी त्या ठिकाणी होत्या. याप्रकरणी तक्रारदार हर्षद मेस्त्री यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी टेम्पो चालक हरिश्चंद्र शिवशरण कुमार जयस्वाल (२७) रा -शिरोडा नाका ,सावंतवाडी आणि टेम्पो मालक सुनील बळवंत केळुसकर (५०) माठेवाडा , सावंतवाडी या दोंघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .









