रत्नागिरी :
तालुक्यातील नाखरे येथे दारूच्या नशेत बापाने मुलाला कुदळीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास घडली, अक्षय संजय शिंदे (२८, रा. नाखरे रत्नागिरी) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अक्षयने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पूर्णगड पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. संजय सुधाकर शिंदे (रा. नाखरे उंबरवाडी) असे गुन्हा दाखल करंण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संजय हा ७ फेब्रुवारी रोजी रात्री दारू पिऊन घरी आला. तसेच कोणतेही कारण नसताना पत्नी व मुलगा अक्षयला शिवीगाळ करु लागला. दारूच्या नशेत संजयने मुलगा अक्षय याला कुदळीने मारहाण केली, अशी नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








