नायजेरियन युवकाला अटक
प्रतिनिधी /पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिसांनी धारगळ येथे केलेल्या कारवाईत सहा लाख रुपये किमतीचा कोकेन जप्त केला आहे. या प्रकरणात एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव अदेकुनले ओपेयमी (34, नायजेरियन) असे आहे. धारगळ नवेवाडा पंचायतीजवळ ड्रग्सची विक्री करण्यासाठी तो येणार असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती.
धारगळ पंचायत परिसरात पोलीस दबा धरून बसले होते. ठरलेल्या वेळेत संशयित आला असता त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 60 ग्रॅम कोकेन अमलीपदार्थ सापडला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









