साबणाच्या पाकिटांमध्ये सापडले 3.5 किलो हेरॉईन
वृत्तसंस्था /ऐझवाल
मिझोराम पोलिसांनी प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करत मोठी कारवाई केली आहे. साबणाच्या बॉक्समध्ये लपवून तस्करी करण्यात येत असलेले सुमारे 17 कोटी ऊपये किमतीचे 3.47 किलो हेरॉईन हस्तगत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी मामित जिह्यात ही कारवाई करण्यात आली. इद्रिश मिया आणि खुगोन दास अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविऊद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.









