15 किलो 775 ग्रॅम हेरॉइनचा साठा जप्त
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फिरोजपूरमधील हबीबवाला येथील रहिवासी सोनू सिंग याला सीमेपलीकडून ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 15 किलो 775 ग्रॅम हेरॉइन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपये किंमत असल्याचे सांगितले जाते. हे संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क कपूरथळा तुरुंगात बंद असलेल्या एका आरोपीद्वारे चालवले जात असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. जप्त करण्यात आलेली ही खेप पाकिस्तानमधील तस्करांनी पाठवली होती. या टोळीचे संबंध सीमेपलीकडे तसेच पंजाब आणि इतर राज्यांमध्ये पसरलेले असू शकतात असा पोलिसांना संशय आहे.









