सोनाली फोगट खून प्रकरणातील पाचवी अटक : रामदासने दत्तप्रसादकडे पोहोचविले अंमलीपदार्थ,अनेकांना होणार अटक, हणजूण बनले ‘हॉट स्पॉट’
प्रतिनिधी /पणजी
भाजपनेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या खून प्रकरणी काल रविवारी सकाळी हणजूण येथील ड्रग्ज पॅडलर रामदास मांद्रेकर याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आतापर्यंतची ही पाचवी अटक आहे. शनिवारी अटक करण्यात आलेल्या दत्तप्रसाद गावकर या रुमबॉयपर्यंत अंमलीपदार्थ या रामदासने पोहोचविला आणि पुढे दत्तप्रसादने तो सुधीर सांगवानपर्यंत पोहोचविला होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
शनिवारी अटक केलेल्या दत्तप्रसाद गावकर याला पोलिसांनी प्रसाद दिल्यानंतर त्याने रामदास मांद्रेकरचे नाव उघड केले. मांद्रेकरने आपण अंमलीपदार्थ दत्तप्रसादकडे दिल्याची कबुली दिली आहे. अंमलीपदार्थ व्यवहारात रामदास मांद्रेकर हा गुंतल्याची चर्चा हणजूण भागात अनेक वर्षांपासून सुरु होती, मात्र तो कधीच पोलिसांच्या सापळय़ात अडकला नव्हता. सोनाली फोगट प्रकरणामुळे त्याच्यासह अनेकांना कोठडीची हवा खावी लागली आहे. येत्या काही दिवसांत अजून काहींना अटक होण्याची शक्यता असल्याने सध्या हणजूण ‘हॉट स्पॉट’ बनले आहे. म्हापसा प्रथम सत्र न्यायालयाने मांद्रेकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
हणजूण येथील कर्लीज बार रेस्टॉरंटचा मालक म्हणून अटक केलेला एडवीन नुनीस आणि रुमबॉय दत्तप्रसाद गावकर यांनाही काल म्हापसा सत्र न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे,
एडवीन नुनीस मालक नाहीच?
म्हापसा सत्र न्यायालयातील सुनावणीच्यावेळीच उघडकीस आले की एडवीन नुनीस हा कर्लीजचा मालक नाही. प्रत्यक्षात अन्य कोणीतरी मालक आहे. त्यामुळे एडवीन नुसीस याने केलेला जामीन अर्जही न्यायालयाने फ्sढटाळून लावला आहे. कर्लीजचा खरा मालक कोण? हे गुलदस्त्यात आहे. त्याबाबतची कागदपत्रे नसल्याचे सुनावणीच्यावेळी स्पष्ट झाले.
अंमलीपदार्थ न्यायालयात सादर
जो अंमलीपदार्थ रामदास मांद्रेकरने पुरविला होता, तो कर्लीजच्या प्रसाधन कक्षातही सापडला होता. त्यामुळे हा बार म्हणजे अमलीपदार्थ पुरवण्याचा खरेदी-विक्रीचा अड्डा की काय? याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. प्रसाधन कक्षात सापडलेले अमलीपदार्थ प्लास्टिक पिशवीत घालून न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद झाल्यावर सत्र न्यायालयाने पोलिसांना अधिक चौकशी करता यावी म्हणून संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. रामदास मांद्रेकर याच्याकडे अमलीपदार्थ कोठून आले याचा तपास करण्यात येत आहे.
संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करा : जसपाल सिंग

पोलीस महासंचालक जसपाल यांनी काल रविवारी पुन्हा तपास अधिकाऱयांना सूचना केली आहे की या प्रकरणातील सर्व संशयितांना गुन्हेगार सिद्ध करण्यापुरतेच मर्यादीत राहू नका. या प्रकरणाबाहेरही जाऊन अधिक मेहनत करुन अधिकधिक चौकशी करुन कारवाई करा. मुख्य म्हणजे ज्या ड्रग्जमुळे हे सारे घडले त्या ड्रग्ज व्यवसायाचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करुन टाका, अशीही सूचना केली आहे.
पोलीस महासंचालक : जसपाल सिंग
…तर फोगाट मृत्यूप्रकरण सीबीआयकडे देणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान

गरज भासली तर सोनाली खूनप्रकरण सीबीआयकडे देण्याची तयारी गोवा सरकारने दर्शवली असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी आपल्याशी फ्ढाsनवर बोलणी केली असून सीबीआय चौकशी करण्याची सूचना दिली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
फ्ढाsगट प्रकरणाची चौकशी योग्य मार्गाने होत असून त्यात गुंतलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा सर्वांना गजाआड करून त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. प्रकरणात हात असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यां सांगितले.
फोगाट यांच्या कुटुंबियांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची याचना केली आहे. त्याला आपली कोणाचीच हरकत नाही. गोवा राज्यात पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांनी अमलीपदार्थांपासून दूर रहावे. त्यांचा वापर करू नये. अमलीपदार्थांना पर्यटकांनी थारा देउ नये. अमलीपदार्थ विभाग सक्रिय असून त्याची पाळेमुळे खणून काढली जातील. फोगाट प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यात आणखी कोण सामील असतील तर त्यांनाही अटक होईल. कोणालाही मोकळे सोडण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.









