रायगड प्रतिनिधी
मुंब्रा पोलीस स्टेशनच्या परिसरात अंमली पदार्थाचे साठा करणे, खरेदी विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठानकडून देण्यात आले होते. या आदेशावरून मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी अमली पदार्थाच्या विक्री करणाऱ्यांबरोबर मोबाईलची चोरी करणारे त्याचबरोबर नशेसाठी कोरेक्स बाटल्यांचा साठा करून विक्री करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आले. आरोपीकडुन वेगवेगळया कंपनीचे ९१ महागडे मोबाईल व मॅक्सकॉप कंपनीची ५०२ कोरेक्स बॉटल्स असे एकूण ९, लाख१५, हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे यांना मिळालेल्या माहितीवरून रशीद कंम्पाउंड, कौसा, मुंब्रा या ठिकाणी एका इसमाच्या घरात चोरीचे मोबाईल व मॅक्सकॉफ कंपनीच्या कफ सिरफ बॉटल्सची साठवणूक करून ठेवली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रिजवान चाळ, रुम नंबर ०२ मध्ये रशीद कंम्पाउंन्ड, पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी फैयाज फरीद शेख (२४ ) या इसमाचे ताब्यात सदर ठिकाणी वेगवेगळया कंपनीचे ६२ मोबाईल फोन मिळून आले. त्याचप्रमाणे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मॅक्सकॉप कफसिरफच्या ५०२ बॉटल्स मिळुन आल्या. सदरचे मोबाईल हे चोरीचे असुन त्याची विक्री करण्यासाठी घेतल्याचे तपासामध्ये उघड झाले. तसेच कोरॅक्स बॉटल या विक्री करण्याकरीता साठा करण्यात आला असल्याचे देखील फैयाज यांनी सांगितले . पोलिसांनी भादवि कलम ३७९, ३२८,२७६, ३४ सह औगने व सौदर्य प्रसाधने कायदा कलम १९४० व त्या अंतर्गत नियम १९४५ चे कलम १८ अ,२८,१८ (क), २७ (ब) (२) प्रमाणे दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे.
आरोपीच्या घराची तपासणी केली असता वेगवेगळया कंपनीचे ६२ मोबाईल सापडले. याप्रकरणी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने मोहम्मद शोएब सलीम शेख उर्फ राज (वय २१ वर्षे) याच्यासह चोरी करून आणल्याचे माहिती दिली. सदरचे मोबाईल हे चोरी केलेनंतर ते गुन्हयातील आरोपी मोहम्मद हन्जला सलीम अन्सारी उर्फ केफ (वय २०) याला विकत होते . अशी माहिती दिल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले व अधिक तपास केला असता, अन्यसाथीदारांची नावे सांगितली, पोलिसांनी फैसल सलाउद्दीन शेख (२०), मोहम्मद अझहर जुबेर शेख ( ३२) यांना देत असल्या बाबत त्याने सांगितले असल्याने त्यांना देखील ताब्यात घेतले.
या आरोपींचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांच्याकडून ९१ मोबाईल फोन व आयएमइआय नंबर ब्रेक करण्यासाठी वापरण्यात आलेला १ लॅपटॉप , सॉफ्टवेअर हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केली असुन सदर आरोपींकडुन मिळुन आलेल्या मॅक्सकॉप कफसिरफच्या ५०२ बॉटल्स आरोपीने कोठुन व कोणाकडुन विकत घेतल्या याबाबत तपास चालू आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.








