मिरज :
मालगांव (ता.मिरज) येथे एका सराईत नशेखोर गुन्हेगाराचा काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण कऊन खून केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. बहाद्दूर चाँद देसाई (वय 48, रा. शास्त्राrनगर, मालगांव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अज्ञात हल्लेखोरांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत बहाद्दूर हा अट्टल नशेखोर असून, दाऊच्या पैशांसाठी तो ग्रामस्थांवर ब्लेडने हल्ले करायचा. याच कारणातून त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरूवारी सकाळी मालगांव-तानंग रस्त्यावरील म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या कॅनॉजवळ बहाद्दूर देसाई याचा मृतदेह मिळून आला. पोलिसांना घटनास्थळी काठी सापडली आहे. सदर काठीनेच बहाद्दूर याला बेदम मारहाण कऊन खून केल्याचे समोर आले. मात्र, हल्लेखोर अज्ञात असल्याचे पोलिसांनी सांगितले. बहाद्दूर देसाई हा मुळचा सोलापूर येथील रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षांपासून देसाई मालगावातील शास्त्रीनगर येथे स्थायिक झाला होता. दाऊसाठी त्याने अनेकांवर हल्ले केले होते. त्याच्यावर ग्रामीण पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल गुरव हे करीत आहेत.








