Kohinoor Diamond : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनमधून भारताचा कोहिनूर हिरा परत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा असल्याचा दावा ओडिशामधील सामाजिक- सांस्कृतिक संस्थेने केला आहे. ब्रिटनमधून तो परत आणण्यायाठी राष्ट्रपतींना त्यांनी साकडं घातल आहे. यापूर्वी बकिंगहॅम पॅलेसला याबाबत पत्रही पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १०५ कॅरेटचा अतिमौल्यवान हिरा परत मिळावा यासाठी राष्ट्रपतींनी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
कोहिनूरसाठी राष्ट्रपतींना साकडं
-कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ देवस्थानचा आहे.
-१०५ कॅरेटचा अतिमौल्यवान हिरा जगातल्या उत्तम हिऱ्यामध्ये त्याची गणना होते.
-पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांनी कोहिनूर भगवान जगन्नाथ यांना समर्पित केला होता.
-अफगाणिस्तानच्या मादिरशाहविरुध्द विजय मिळवल्यानंतर कोहिनूर जगन्नाथाला समर्पित केला होता.पण कोहिनूर लगेचच मंदिराकडे सुपूर्द केला नाहि.
-भगवान जगन्नाथ यांना कोहिनूर समर्पित केल्याचा रणजीतसिहांच्या मृत्यूपत्रात उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे.
-रणजीतसिह यांचा १८३९ साली मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिशांनी हिरा जबरदस्तीने घेतला.
-रणजीतसिंह यांचे पुत्र दुलीप सिंह यांच्याकडून ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा बळकावल्याचा दावा करण्यात आला होता.
-कोहिनूर हिरा लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीला समर्पित केल्याचं पुरातत्व खात्यानं उत्तर दिलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









