प्रतिनिधी/ बेंगळूर
चाचणी उड्डाणावरील मानवरहित ड्रोन विमान रविवारी सकाळी चित्रदुर्ग जिल्ह्याच्या हिरीयुर तालुक्मयातील वद्दीकेरे गावाजवळ कोसळले. चळ्ळकेरे तालुक्यातील कुंदापूर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या लढाऊ विमानाने रविवारी सकाळी नायकनहट्टीजवळील कुंदापूर हवाई तळावरून उड्डाण केले. मात्र, तांत्रिक दोषामुळे शेतामध्ये कोसळले आहे. दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करून विमानाचे जीवाश्म कुतूहलाने पाहत आहेत. याची माहिती मिळताच पोलीस आणि डीआरडीओचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत. ही घटना आईमंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे.