वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबमधील अमृतसरच्या सीमावर्ती भागात एक ड्रोन आढळल्याने तपास यंत्रणा अधिक तपासाला लागल्या आहेत. पंजाबमधील अमृतसर येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळील एका शेतात हे ड्रोन जप्त करण्यात आले. बीएसएफने अमृतसरच्या सीमावर्ती भागात शोधमोहीम राबवली असताना खानवाल गावाजवळील एका शेतातून एक ड्रोन सापडला. या ड्रोनमधून अमली पदार्थ पाठविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, बीएसएफ जवानांनी परिसरात राबविलेल्या शोधमोहिमेत कोणत्याही संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत.









